बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन आज चित्रपटसृष्टीपासून लांब असल्या तरी राजकारणात सक्रिय आहेत. जया आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. इतकंच नव्हे तर पत्रकार आणि पापाराझींबरोबर त्यांचे उडणारे खटके यामुळेसुद्धा त्या बऱ्याचदा चर्चेत असतात. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीने जया बच्चन यांच्या या बेधडक स्वभावाविषयी आणि पापाराझींना फटकारण्याविषयी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोंकणा सेन शर्मा ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने जया बच्चन यांच्या स्वभावाचे कौतुक केल्याने ती चर्चेत आली आहे. कोंकणा सेन शर्माने जया बच्चन यांच्याबरोबर ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात काम केले आहे. कोंकणाने जया बच्चन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे, इतकंच नव्हे तर पापाराझींसोबतच्या त्याच्या वर्तनाचेही कोंकणाने कौतुक केले.

आणखी वाचा : नागा चैतन्यबरोबरचं नातं अन् घटस्फोटाबद्दल समांथा रूथ प्रभूने सोडलं मौन; म्हणाली “मला काहीही विसरायचं…”

एका मीडिया चॅनलशी संवाद साधताना कोंकणा सेन जया बच्चन यांच्याबद्दल म्हणाली की, ” आम्ही एकत्र काम करायचो तेव्हा गप्पा मारताना संभाषणादरम्यान त्या आम्हाला अनेक मजेदार किस्से सांगायच्या. त्यांचा स्वभाव मला अजूनही खूप आवडतो. शिवाय त्या पापाराझींना ज्या पद्धतीने फटकारतात ते प्रचंड मला आवडते. त्यांचा ‘नो-नॉनसेंस एटीट्यूड’ मला प्रचंड भावतो.”

आणखी वाचा : ओळखा पाहू बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री कोण? सलमान खानशी आहे खास कनेक्शन

याबरोबरच कोंकणाने ‘वेक अप सीड’, ‘ओमकारा’, ‘तलवार’, ‘लाईफ इन ए मेट्रो’ अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. ‘लागा चुनरी में दाग’ची आठवण सांगताना ती म्हणाली, “शूटिंगदरम्यानच्या सर्व सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत. आम्ही बनारस (वाराणसी) मध्ये शूटिंग करत होतो. हा माझ्या करिअरचा सुरुवातीचा टप्पा होता आणि माझे सर्वात मोठे आऊटडोर शूटदेखील होते. मला घराची खूप आठवण येत होती. पण, जया बच्चन यांनी माझी खूप काळजी घेतली. यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन. जया दीदी खास आहेत. त्यांच्याबद्दल मनात कायम आदरच असेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkona sen sharma speaks about jaya bachchan and their relation with media reporters avn