Kriti Kharbanda Pulkit Samrat got married:अभिनेत्री क्रिती खरबंदा व अभिनेता पुलकित सम्राट लग्नबंधनात अडकले आहेत. क्रितीने लग्नातील काही खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. क्रिती व पुलकित दोघेही या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने शुक्रवारी (१५ मार्च रोजी) मानेसरमध्ये लग्नगाठ बांधली.

लग्नासाठी क्रितीने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा निवडला होता, तर पुलकितने या खा दिवसासाठी ऑलिव्ह ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती. पुलकितच्या शेरवानीची खासियत म्हणजे यावर संस्कृतमध्ये मंत्र लिहिलेले दिसत आहेत. सुंदर कॅप्शन देत क्रितीने हे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

क्रिती व पुलकित यांच्यावर चाहते व बॉलीवूड सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दोघेही लग्नानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत, त्यासाठी कमेंट करून चाहते व मित्र-मैत्रिणी त्याचं अभिनंदन करत आहेत. दरम्यान, पुलकित व क्रितीबद्दल बोलायचं झाल्यास मागच्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे संकेत फोटो पोस्ट करून दिले होते. दोघांनी १५ मार्च रोजी मानेसरमध्ये कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

Story img Loader