अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये नुकतीच नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या क्रितीने आता निर्माती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. नुकतंच क्रितीने स्वतःच्या चित्रपट निर्मिती कंपनीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. मात्र, तिच्या या नव्या निर्मिती कंपनीचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘तो’ पुरस्कार मिळवण्यासाठी शाहरुख खान गेला होता खालच्या थरारा; अभिनेत्याने सांगितला किस्सा
या नव्या निर्मिती कंपनीच्या शुभारंभानंतर अनेकांनी क्रितीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी या निर्मिती कंपनीचा संबंध सुशांत सिंग राजपूतशी जोडला आहे. काहींच्या मते क्रितीने ही निर्मिती कंपनी सुशांत सिंह राजपूतच्या स्मरणार्थ सुरू केली आहे. खरं तर, सुशांत सिंह राजपूत ‘ब्लू बटरफ्लाय’ इमोजी खूप वापरत होता. ही इमोजी त्यांच्या पोस्ट आणि कमेंटमध्ये नेहमीच दिसत होती.
त्याच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की त्याने चॅटिंग करतानाही या इमोजीचा अनेकदा वापर केला आहे. आता क्रिती सेनॉनच्या निर्मिती कंपनीचे नाव ही ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असल्याने चाहते या कंपनीचा सुशांत सिंह राजपूतचाही संबंध असल्याचे तर्के लावत आहेत. अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की सुशांतला स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करायचे होते, क्रिती असे करून त्याची इच्छा पूर्ण करत आहे.
हेही वाचा- “माय हॉटी…” रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच क्रितीची ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण संवाद, व्हीएफएक्स व कलाकारांच्या लूकमुळे या चित्रपटावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानेच म्हणावी तशी जादू दाखवू शकला नाही. ६०० कोटींच बजेट असलेला हा चित्रपट ३०० कोटींची कमाईही करू शकला नाही.