अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फार कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्या ती आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रिती आणि प्रभास हे ‘आदिपुरूष’ चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिती साऊथ सुपरस्टार प्रभासच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र त्या दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगलं होतं. अखेर क्रितीने प्रभासच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिती सनॉन आणि अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला भेडिया हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी क्रिती आणि वरुण ‘झलक दिखला जा १०’ च्या फिनालेमध्ये गेले होते. यावेळी वरुणने क्रिती आणि प्रभासच्या नात्याबद्दल एक सूचक इशारा दिला. यावेळीझलक दिखला जा च्या सेटवर करण जोहरने वरुणला प्रश्न केला की ‘क्रितीचे नाव यादीत का नाही?’ यावर क्रिती म्हणते की ‘मलाही हेच विचारायचं होतं’. त्यावर उत्तर देताना वरुण म्हणाला, ‘कारण क्रितीचं नाव कोणाच्या तरी हृदयात आहे. एक व्यक्ती जी सध्या मुंबईत नाही आणि दीपिकाबरोबर शूटिंग करत आहे.’
आणखी वाचा : प्रभास व क्रितीच्या नात्यावर वरुण धवनने केलं शिक्कामोर्तब; म्हणाला, “तो सध्या मुंबईत….”

वरुणचं हे बोलणं ऐकून क्रिती हसायला लागली. वरुणने नाव न घेता ज्या व्यक्तीचा उल्लेख केला तो प्रभास होता. कारण सध्या प्रभास दीपिकासह एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. क्रितीने मात्र वरुणच्या वक्तव्यानंतर डोक्याला हात लावला, पण इतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अखेर क्रितीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत यावर मौन सोडले आहे.

“हे प्रेम नाही किंवा प्रमोशन देखील नाही. आमचा ‘भेडिया’ म्हणजे वरुण धवन रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. त्यामुळे या अफवा पसरल्या. पण काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच मी या अफवांना पूर्णविराम देते. ही अफवा कशाचाही आधार नसलेली पूर्णतः बेसलेस आहे. त्यामुळे कृपया यावर विश्वास ठेवू नका”, असे क्रितीने म्हटले.

आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

दरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ जून २०१३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kriti sanon breaks silence on prabhas dating rumours says its neither pyaar nor pr nrp