Kriti Sanon Deepfake Video: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन अधिक सुकर झालं असलं तरी यामुळे बऱ्याच प्रमाणात धोकादेखील निर्माण झाला आहे. खासकरून सेलिब्रिटीजसाठी हा खूप मोठा धोका आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ’ने चांगलीच खळबळ उडवली होती. मूळ व्हिडिओमध्ये ब्रिटिश भारतीय मुलगी ‘झारा पटेल’ होती, परंतु तिच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
रश्मिकापाठोपाठ काजोलचाही असाच डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. काहीच दिवसांपूर्वी आलिया भट्टच्या डीपफेक व्हिडीओची खूप चर्चा झाली. आता यापाठोपाठ बॉलिवूडची सध्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री क्रीती सेनॉनचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. या बनावटी व्हिडीओज बनवणाऱ्या लोकांनी बॉलिवूड अभिनेत्रींनाच आपला निशाणा बनवल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
आणखी वाचा : ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान रेखा यांच्या ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ चर्चेत
‘kritisanon.ilyy’ या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये एका हॉट आणि बोल्ड अशा अवतारात क्रीती तिचे क्लिवेज दाखवताना दिसत आहे. ही मॉडेल वेगळी असून तिच्या चेहेऱ्याच्या जागी क्रीतीचा चेहेरा लावण्यात आला आहे अन् ती अश्लील हावभाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खोटा आहे हे कळून येत असलं तरी बऱ्याच लोकांचा काही क्षणापुरता गोंधळ होत आहे. या व्हिडीओच्या खाली बऱ्याच लोकांनी कॉमेंटमध्ये हा व्हिडीओ रिपोर्ट करायची विनंती केली आहे.
इतकंच नव्हे तर या प्रोफाइलवर क्रीती सेनॉनचे असेच काही बोल्ड, अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडीओज आणि फोटोज पाहायला मिळत आहे. क्रीतीच्या व्हायरल होणाऱ्या या डीपफेक व्हिडीओमुळे मात्र सायबर सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता लवकरच आलिया भट्ट आणि क्रीती सेनॉनच्या या व्हिडीओ प्रकरणावरही त्वरित कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. केवळ रश्मिका, काजोल किंवा क्रीतीच नव्हे तर सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांचेदेखील असेच फोटो आणि व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाले होते.