‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने वाद सुरू आहे. चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्सवरून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर निर्मात्यांनी संवादात बदल केले आहेत. इतकंच नाही तर चित्रपटातील राम, सीता व रावण यांच्या लूकवरून प्रचंड टीका झाली. याच सर्व गदारोळावर सीतेची भूमिका साकारणाची अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या आईची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे.

सहाव्या दिवशी ‘आदिपुरुष’चा गेम ओव्हर, कमाईत मोठी घट झाल्यानंतर निर्मात्यांनी ‘या’ ऑफरची केली घोषणा

क्रितीची आई गीता सेनॉन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिलं, “जय श्री राम. जाकी राही भावना जैसी, प्रभू मूरत तिन तैसी…’ याचा अर्थ असा की जर तुम्ही चांगल्या विचाराने आणि दृष्टीने पाहिले तर हे जग सुंदर दिसेल. प्रभू रामाने आपल्याला शबरीच्या बोरांमध्ये प्रेम पाहायला शिकवले आहे, ते उष्टे होते, हे नाही. त्यामुळे माणसाच्या चुका नाही, त्यांच्या भावना समजून घ्या.”

गीता सेनॉन यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहेत. “हा सगळा भावनांचा खेळ आहे. या चित्रपटाने ना लोकांच्या भावना समजून घेतल्या, ना हिंदू धर्माचा आदर केला. आणि उलट आमच्या भावना समजून घ्याव्यात हीच अपेक्षा? तुम्ही आधी जा आणि रामायणाचे पावित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. रामायण हा आपला वारसा आहे, क्रिएटीव्ह लिबर्टीच्या नावाखाली अपमान नाही,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

user comment
गीता सेनॉन यांच्या पोस्टवरील कमेंट

आपल्या मुलीची बाजू घेण्याऐवजी तिला हिंदू धर्मातील परंपरा आणि इतर गोष्टी शिकवा, असं काही जणांनी म्हटलंय. इतका वादग्रस्त चित्रपट बनवून तुमची मुलगी आणि इतर कलाकार त्याच्या कमाईचे आकडे शेअर करत आहेत, हे लाजिरवाणी बाब असल्याचंही काही युजर्सनी म्हटलं आहे.