अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षात मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या क्रितीने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. अभिनेत्री असलेली क्रिती आता निर्माती झाली आहे. तिने स्वतःच्या चित्रपट निर्मिती कंपनीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली.

“माझं करिअर बरबाद झालं”, विक्रम भट्टबरोबरच्या अफेअरबद्दल अमीषा पटेलने सोडलं मौन; म्हणाली, “१३ वर्षे मी…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…

क्रितीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “या जादूई इंडस्ट्रीत माझी स्वप्ने पूर्ण करून मला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी लहान पाऊलं टाकली, शिकले आणि विकसित होत गेले आणि अभिनेत्री झाले! मला चित्रपट निर्मिती खूप आवडते. त्यामुळे त्यात जास्त काम करण्याची, नवीन गोष्टी शिकून घेण्याची, तुमच्या व माझ्या हृदयाला स्पर्श करणार्‍या आणखी कथा सांगण्याची माझी इच्छा आहे. आता मी मोठ्या स्वप्नांसह ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ सुरू करण्यास उत्सुक आहे!! लवकरच नवीन घोषणा करेन.”

दरम्यान, अभिनेत्री म्हणून नऊ वर्षांच्या करिअरनंतर क्रितीने आता स्वतःची चित्रपट निर्मात्या कंपनीची घोषणा केली आहे. तिने ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असं कंपनीचं नाव ठेवलं आहे. क्रितीने याबद्दलची पोस्ट टाकताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रितेश देशमुख, वरुण धवन, हुमा कुरेशी, आनंद एल रॉय, संजना संघी, क्रिती खरबंदा यांनी कमेंट्स करत क्रितीला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने सांगितली अपेक्षांची यादी; म्हणाली, “त्याला मराठी यायला हवं आणि…”

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच क्रितीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज झाला होता. पण तो संवाद, व्हीएफएक्स व कलाकारांच्या लूकमुळे वादात अडकला. त्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, ६०० कोटींच बजेट असलेला ‘आदिपुरुष’ ३०० कोटींची कमाईही करू शकला नाही. अशातच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर क्रितीने तिने स्वतःची कंपनी सुरू केली आहे.

Story img Loader