क्रिती सेनॉनने फार कमी वेळात बॉलिवूडच्या टॉप हिरोइन्समध्ये स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. ९ वर्षांच्या कारकिर्दीत क्रितीने एक राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय फोर्ब्सच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीतही तिचा समावेश झाला आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी क्रिती सॅनन एक मॉडेल होती. त्यादरम्यान अभिनेत्रीबरोबर अशा काही घटना घडल्या ज्याच्या आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत.

क्रिती सेनॉनने ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या फॅशन शोचा किस्सा शेअर केला आहे. तिने सांगितले की एका कोरिओग्राफरने तिला इतर ५० मॉडेल्ससमोर अत्यंत वाईट शब्दांत फटकारले आणि त्यामुळे तिला रडू आले. क्रितीने बॅकअप प्लॅनसह फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता, जेणेकरून तिचे पालक तिच्या भवितव्याबद्दल फार चिंता करणार नाहीत.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा : ‘हा’ असेल अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरमधील सर्वात महागडा चित्रपट; बजेट ऐकून व्हाल थक्क

क्रिती म्हणाली, ‘तो माझा पहिला रॅम्प शो होता आणि मी त्या कोरिओग्राफरबरोबर कधीच काम केले नव्हते. ती माझ्याशी खूप उद्धटपणे बोलत होती कारण माझ्याकडून चूक होत होती. ती माझी पहिलीच वेळ होती. तो अनुभव फारच वाईट होता. ५० इतर मॉडेल्ससमोर ती मला ओरडली ज्यामुळे मला रडू कोसळले. ती मला खूप शिव्या देत होती. ही घटना माझ्या मनात बराच काळ घर करून बसली.”

क्रिती आता लवकरच टायगर श्रॉफबरोबर ‘गणपत : पार्ट १’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तिचा शाहिद कपूरबरोबरचा एक चित्रपट आहे आणि तिचा स्वतःचा प्रोडक्शन डेब्यू ‘दो पत्ती’ हे चित्रपटही मागोमाग येणार आहेत. क्रिती सेनॉन यावर्षी ‘आदिपुरुष’ आणि ‘शेहजादा’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.

Story img Loader