हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. १६ जूनला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. ट्रेलर लॉंचिंगवेळी चित्रपटातील प्रत्येक कलाकार कथेला आणि पात्राला अनुसरून पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. या वेळी अभिनेत्री क्रिती सेनॉनने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, केवळ तिने साकारलेल्या लुकमुळेच नाही तर क्रितीने आपल्या कृतीनेही सर्वांचे मन जिंकले.

हेही वाचा : “लग्नाला बोलवणार का?” पापाराझींच्या प्रश्नावर राघव-परिणीती म्हणाले…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंचिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेलरच्या स्क्रीनिंगचे आयोजन एका चित्रपटगृहात करण्यात आले होते. या ठिकाणी चाहते, मीडिया आणि चित्रपटातील इतर सहकाऱ्यांनी आधीपासूनच गर्दी केली होती. यानंतर आलेल्या क्रिती सेनॉनला संपूर्ण चित्रपटगृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, परंतु जराही विचार न करता ती थेट जमिनीवर बसली. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी तिला खुर्चीवर बसण्याची विनंती केली, पण तिने जमिनीवर बसणे पसंत केले आणि सर्वांची मने जिंकली. क्रितीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.

‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉंचिंगसाठी क्रिती सेनॉनने खास लुक केला होता. या चित्रपटात क्रितीने सीतेचे पात्र साकारले आहे. यानुसार क्रितीने पांढरी साडी नेसून त्यावर पिवळ्या आणि लाल रंगाची लेस लावली होती. पिवळ्या ब्लाऊजसोबत तिने हटके पारपंरिक लुक केला होता.

हेही वाचा : प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर पडली अन् पापाराझींनी चक्क… अभिनेत्री म्हणाली, “माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये…”

‘आदिपुरुष’ चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असून यामध्ये अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाची, कृती सेनॉन सीतेची, सैफ अली खान रावणाची, तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader