‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांच्या काही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. त्यांनी साकारालेली ‘पाकिजा’ तर कोणीच विसरु शकले नाही. चित्रपटरसिकांचे भान हरपणाऱ्या या सौंदर्यवतीचे आयुष्य रुपेरी पडद्यावर मोहक वाटायचे, पण तिचे खासगी आयुष्यात मात्र तसे नव्हते. अभिनयाबरोबरच शेरो-शायरी करणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्यामुळे त्या खचल्या होत्या. त्याच सर्व गोष्टी आणि या अभिजात सौंदर्य लाभलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी लिओनीपासून कंगनापर्यंत कित्येक अभिनेत्रींची नावं या आगामी बायोपिकशी जोडली गेली होती. अखेर या बायोपिकबद्दल एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रीपोर्टनुसार फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या बायोपिकचं दिग्दर्शन करणार असून तो या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘टी-सिरिज’ अन् भूषण कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

आणखी वाचा : “माझ्या आईने एका ‘हॅलो’वरुन ओळखलं…”, अतुल परचुरेंनी उलगडला कॅन्सरशी दिलेला लढा

याबरोबरच या बायोपिकमध्ये मीना कुमारी यांची भूमिका कोणती अभिनेत्री निभावणार यावार प्रचंद चर्चा सुरू होती. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री क्रीती सनॉन दिसणार असल्याचं म्हंटलं जात आहे. अद्याप चित्रपटाबद्दल कसलीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण लवकरच या चित्रपटाचे निर्माते याची अधिकृत घोषणा करतील असं स्पष्ट झालं आहे.

तब्बल ३ दशकं आणि ९० चित्रपटात काम केलेल्या मीना कुमारी यांची अदाकारी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये क्रीती सनॉन दिसणार असल्याचं स्पष्ट होताच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. गेल्या काही चित्रपटातून क्रीतीने स्वतःला अभिनयाच्या बाबतीत सिद्ध केलं आहे. नुकतंच क्रीती सनॉन सुपरस्टार प्रभाससह ‘आदिपुरुष’ या चित्रपटात झळकली. चित्रपटाला प्रचंद विरोध झाला, पण क्रीतीच्या कामाचं बऱ्याच लोकांनी कौतुकही केलं. आता मीना कुमारी यांच्या जीवनावर बेतलेल्या या बायोपिकमध्ये क्रीतीची अदाकारी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.