बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसह गाणी प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच यामध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेनॉन नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचली. यावेळी तिने सीता गुंफेलाही भेट दिली.
क्रिती सेनॉनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती सीता गुंफा आणि काळाराम मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे. यावेळी तिच्याबरोबर संगीतकार पती-पत्नी सचेत व परंपराही होते. ‘राम सिया राम’ हे गाणं रिलीज झाल्यानंतर क्रिती नाशिकला पोहोचली. तिथे तिने माता सीतेचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. ती या मंदिरात भक्तीभावाने पूजा करताना दिसत आहे.
यावेळी त्यांनी ‘राम सिया राम’ गाण्यावर देवाची आरतीही केली आहे. आरतीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी क्रितीने सलवार सूट परिधान केला होता. ती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
वनवासाच्या काळात माता सीता, भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांनी नाशिकच्या पंचवटीमध्ये बराच काळ घालवला होता, अशी आख्यायिका आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला रिलीज होत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.