२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला क्रिती सेनॉनचा ‘मिमी’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर तिचे ‘हम दो हमारे दो’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘हिरोपती २’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ती ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये जानकी हे पात्र साकारले आहे. या वर्षामध्ये क्रितीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्रिती सेनॉनचा ‘भेडिया’ (Bhediya) हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. वरुण धवन भेडियामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. वरुण, क्रिती यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट विनोदी भयपट शैलीतला असून त्याचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. चित्रपटाचा नवे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.
आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला बांगलादेशात कार्यक्रमास बंदी, कारण…
क्रिती सेनॉन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिचे फोटो तेथे प्रचंड व्हायरल होत असतात. तिने इन्स्टाग्रामवर ‘भेडिया’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरद्वारे तिचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. खास या चित्रपटासाठी तिने वेगळी केशभूषा केली आहे. पोस्टरमध्ये इन्जेक्शनची सिरीन हातामध्ये घेऊन ती समोर पाहत आहे. या फोटोला तिने “भेटा डॉ. अंकिताला.. भेडियाची डॉक्टर! माणसांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर भेट द्यावी”, असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी यूट्यूबवर पोस्ट केला जाणार आहे.
आणखी वाचा – “मी सात महिने घरात…”; सई ताम्हणकरचा मानसिक तणावाबद्दल मोठा खुलासा
हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’, ‘भुल भुलैया २’ अशा काही विनोदी भयपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडे कलेक्शन केले. अगदी तेव्हापासूनच बॉलिवूडमध्ये या शैलीतल्या चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते.