बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावरून क्रितीच्या अभिनयाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ हे गाणं सध्या बरंच गाजताना दिसत आहे. अशात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रिती सेनॉनने तिच्या आईने तिला करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम करण्यास का नकार दिला हे सांगितलं आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेनॉनने तिच्या आईचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट केला. क्रिती म्हणाली, “तो एक पूर्ण चित्रपट नाही तर एक लघुपट होता. त्यावर माझ्या आईचं असं म्हणणं होतं की ही पूर्ण २० मिनिटं महिलांच्या ऑरगॅझमबद्दल आहेत. जर तू पूर्ण चित्रपटात २० मिनिटांचा असा एखादा सीन करत असशील तर त्याला काही तरी अर्थ आहे.” अशाप्रकारे आमचं बोलणं झालं आणि मला वाटलं की मी ही भूमिका करायला नको.
याबद्दल क्रिती सेनॉनची आई म्हणाली, “मला वाटतं आम्ही सगळेच तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिला अशाप्रकारच्या भूमिकेत पाहण्यास कम्फर्टेबल नव्हतो. ती भूमिका फक्त महिलांच्या ऑरगॅझमबद्दल होती.” आईच्या बोलण्यावर क्रिती म्हणाली, “मला वाटतं तिचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की तो चित्रपट नाही तर एक शॉर्टफिल्म होती. मला नाही वाटत त्यात काही चुकीचं होतं. पण ते ज्या प्रमाणे शूट करण्यात आलं आणि दाखवण्यात आलं. त्याबद्दल बोलायचं तर मला वाटतं जसं करणने सांगितलं की त्यावेळी जर तो माझ्या आईशी बोलला असता तर सर्व ठीक झालं असतं.”
आणखी वाचा- “मी मध्यमवर्गीय कुटुंबात…” क्रिती सेनॉनने स्पष्ट केलं ‘लस्ट स्टोरीज’ नाकारण्याचं कारण
दरम्यान याबाबत ‘कॉफी विथ करण’मध्ये बोलताना क्रिती म्हणाली होती, “माझ्या आईने मला ‘लस्ट स्टोरीज’मधील भूमिकेसाठी नकार दिला होता. कारण त्यातील बोल्ड सीन तिला आवडले नव्हते. त्यामुळे मी या भूमिकेला नकार दिला.” जेव्हा या शोमध्ये क्रितीला विचारण्यात आलं की, ‘निर्मात्यांनी ऑफर केलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी तू आईशी चर्चा करतेस का?’ त्यावर ती म्हणाली, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेय. त्यामुळे असे बोल्ड किंवा वादग्रस्त सीन त्यांच्यासाठी धक्कादायक ठरू शकतात. त्यामुळे मी आईशी बोलते. पण मी नेहमीच चर्चा करत नाही.”