अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांचा आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाची सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तब्बल १० वर्षांनंतर रितेश आणि जिनिलिया ही जोडी पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र आता या चित्रपटाच्या पोस्टरवर कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांचा आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे एक पोस्टर काल प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये रितेश देशमुख हा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला अनेकांनी पसंती दर्शवली होती. मात्र या पोस्टरवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खानने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पोस्टर हुबेहुब कॉपी केल्याचा आरोप केआरकेने केला आहे.
आणखी वाचा : “मै किसीके बच्चे का बाप बनने वाला हूँ…” रितेश देशमुख-जिनिलियाच्या ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

कमाल आर खानने नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एका हॉलिवूड आणि एका दाक्षिणात्य चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबर त्याने रितेशच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. त्यात तो म्हणाला, “या चित्रपट निर्मात्यांची कल्पकता तर पाहा, एका हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर दाक्षिणात्य चित्रपटाने कॉपी केले आणि आता दाक्षिणात्य चित्रपटाचे पोस्टर कॉपीवूड वाल्यांनी कॉपी केले. एवढे होऊनही ते स्वतःला चित्रपट निर्माते म्हणवून घेतात.”

“तसं तर रितेशला सर्व चित्रपटांच्या कथेबद्दल माहिती असते. तुम्ही त्याला कोणतीही स्क्रिप्ट सांगा, तो त्यावर तुम्हाला १० वेगवेगळे सल्ले देईल. पण जेव्हा तो चित्रपटांना होकार देतो तेव्हा मात्र तो स्वप्नात असतो. त्यामुळेच तो बँकचोर, बंगिस्तान, बँजो असे चित्रपट करतो. जर चित्रपट बनवणारेच असे चित्रपट निर्मित करत असतील तर आपण कोणाला दोष देऊ शकतो. जर असे चित्रपट बनत असती तर देवसुद्धा बॉलिवूडला उद्धवस्त होण्यापासून वाचवू शकत नाही”, असे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? प्रसूतीच्या तारखेवरुन चर्चांना उधाण

दरम्यान रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे ते दोघेही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करणार आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर हे कलाकार दिसणार आहेत.

Story img Loader