वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. इंग्लंडमधील ओव्हल येथे टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाने रविवारी ही ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय टीमवर सातत्याने टीका होत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता केआरकेने सनी लियोनीचा उल्लेख करत टीका केली आहे.

टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी; महिन्याला कमावतात ४० लाख ते एक कोटी रुपये

सनी लियोनीच्या एका जाहिरातीचा फोटो शेअर करत केआरकेने टीका केली आहे. “तुम्ही तुमच्या भारतीय संघाची जाहिरात करण्यासाठी पॉर्न स्टार सनी लियोनीला पैसे देत असाल तर तुम्ही कधीही ट्रॉफी जिंकू शकणार नाही. आणि तुमचा मेंदू सडला आहे, याचाच हा पुरावा आहे,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केआरके म्हणजेच कमाल आर खानच्या या ट्वीटवर अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट केल्या आहेत. काहींनी केआरकेचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी केआरकेच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे.