शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. पण चित्रपट त्याच्या पहिल्या गाण्यामुळे वादात सापडला आहे. चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून गदारोळ माजला. आता तर सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात बदल करण्याचेही आदेश दिले आहेत. भगव्या बिकिनीमुळे झालेल्या गोंधळात चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणीही होऊ लागली होती. अशातच आता केआरके म्हणजेच कमाल राशीद खानने यासंदर्भात ट्वीट केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेने पठाण चित्रपट फ्लॉप होणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे आणि त्यामागची तीन कारणंही त्याने सांगितली आहेत. त्याच्या ट्विटमध्ये केआके म्हणाला, “जर शाहरुखला वाटत असेल की माझ्या रिव्ह्यूमुळे त्याचा चित्रपट पठाण फ्लॉप होईल तर तो चुकीचा विचार करत आहे. त्याचा चित्रपट तीन कारणांमुळे फ्लॉप होईल. १) चुकीचे नाव, २) सारखीच स्टोरी आणि अॅक्शन आणि ३) लोकांचा बहिष्कार. त्यामुळे जर तो मला चित्रपटाचा रिव्ह्यू करू नकोस असं सांगले, तर मी करणार नाही,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘पठाण’चं दुसरं गाणं ‘झूम जो पठाण’ प्रदर्शित झालं होतं, त्यावरही केआरकेने टीका केली होती. शाहरुख खान भारतीय प्रेक्षकांना गृहीत धरतोय, असं म्हणत त्याने शाहरुख खानचा उल्लेख टिकटॉक स्टार म्हणूनही केला होता.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ हा आदित्य चोप्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या व्यतिरीक्त जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk gives three reasons why shahrukh khans pathaan will be box office flop hrc