बहुप्रतिक्षीत ‘गदर २’ चा ट्रेलर अखेर २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल ‘गदर २’ प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. एकीकडे ट्रेलरचं कौतुक होतंय, पण बॉलीवूड अभिनेत्याला मात्र ट्रेलर आवडलेला दिसत नाहीये. त्याने या चित्रपटात सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर टीका केली आहे.
“भारत-पाकिस्तानमधील द्वेषाचं कारण…”, गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी सनी देओलचे वक्तव्य
अभिनेता कमाल राशीद खान म्हणजेच केआरकेने ट्वीट करून जीतची भूमिका करणाऱ्या उत्कर्ष शर्माच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे. उत्कर्ष हा चित्रपटाचा दिग्दर्शक अनिल शर्माचा मुलगा आहे. “अरे देवा! गदर २ चित्रपटाचा ट्रेलर किती वाईट आहे! ट्रेलरची सर्वात मोठी अडचण आहे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा. त्याला अभिनयाचा अ देखील माहीत नाही आणि तो हिरोऐवजी गरीब कुटुंबातील मुलीसारखा दिसतो,” असं म्हणत केआरकेने उत्कर्षवर टीका केली आहे.
त्याने दुसरं एक ट्वीट करत हा चित्रपट कोणीच बघणार नसल्याचाही दावा केला आहे. “सनी देओलसाठी लोक गदर २ पाहतील, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण सनीच्या कुटुंबातील सदस्य, शेजारी, त्याच्या घरी काम करणारेही हा चित्रपट पाहणार नाहीत, लोकांनी पाहायचं तर विसरून जा,” असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल व उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.