सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. काहींना ट्रेलर खूप आवडला, तर न आवडणारेही बरेच जण आहेत. अशातच आता केआरकेने ट्रेलरमधील एक स्क्रीनशॉट शेअर करत सलमानच्या उंचीची खिल्ली उडवली आहे.
“जेव्हा हिरो ठेंगणा असतो, तेव्हा असे उंच शूज घालावे लागतात. ६ इंच आत आणि ६ इंच बाहेर. मी ‘देशद्रोही’मध्ये घातले होते,” असं त्याने ट्वीट केलं आहे. पण यात त्याने सलमानचं नाव घेतलेलं नाही, मात्र तो शॉट ट्रेलरमधील असल्याचा दिसतोय.
दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्याने आणखी एक ट्वीट रिट्वीट केलंय. ज्यात सलमानने ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याच्या अॅब्सबद्दल विचारलं असता शर्टचे तीन बटन उघडले होते. त्याचा उल्लेख त्या ट्वीटमध्ये आहेत. त्यातही सलमानची उंची व त्याच्या अॅब्सची खिल्ली उडवण्यात आली आहे.
दरम्यान, सलमानचा हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी यांच्यासह तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.