अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी नवी दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला इथे रावण दहन केले. लाल किल्ल्यावर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला रावण दहनाचा मान मिळाला. कंगनाचे या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान; अध्यक्षांनी सांगितलं निवडीचं कारण

कंगनाचा रावण दहन करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत बॉलीवूड अभिनेता केआरकेने कंगनाची खिल्ली उडवली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत कंगना जय श्री राम म्हणत धनुष्यबाणाने रावणाच्या पुतळ्यावर निशाणा साधते, पण बाण पुतळ्याकडे जाण्याऐवजी तिथेच खाली पडतो. त्यावरून केआरकेने कंगनाला टोला लगावला. “व्वा! कंगनाजींनी रावणावर किती जोरदार निशाणा साधला,” असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलंय.

दरम्यान, रावण दहनासाठी कंगनाची निवड करण्यामागचे कारण दिल्लीच्या लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले. “लव कुश रामलीला समितीला असं वाटतं की महिलांना समान अधिकार असायला हवे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महिला आरक्षण विधेयक देश आणि समाजाच्या विकासात मदत करेल. आता एक महिलाही रावण दहन करू शकते. ती वाईट गोष्टींचाही अंत करू शकते. महिलांनाही हा अधिकार दिला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही कंगनाची निवड केली,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk mocks on kangana ranaut as she fails to aim ravan effigy at delhi on dussehra 2023 hrc
Show comments