भारतातील सर्व मुस्लिमांना धर्मांतर करण्याचा सल्ला चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने दिला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे व ट्वीटमध्ये कायम चर्चेत असणाऱ्या केआरकेचे हे ट्वीट खूप व्हायरल झाले आहे. आपल्या कुटुंबासाठी मुस्लिमांनी धर्मांतर करून हिंदू होणं चांगला पर्याय असल्याचं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानी सीमा हैदर ‘या’ चित्रपटात साकारणार भारतीय रॉ एजंटची भूमिका
“मी भारतातील सर्व मुस्लिमांना सुचवू इच्छितो की धर्मांतर करून हिंदू बनणं चांगलं आहे. कारण आपल्या कुटुंबाचं आयुष्य आणि आपली मुलं ही धर्मापेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. आम्ही भारतीय मुस्लिमांनी अरबांसाठी धर्मांतर केलं, पण अरब देश इस्लामचे रक्षण करण्यास तयार नाही. त्यामुळे आपले कुटुंब वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करण्यात काहीच गैर नाही,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. केआरकेचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे.