अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बीटाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. दोघेही जवळपास पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. दोघांना वयातील अंतरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“आता कुणाविषयी प्रेम, आदर वाटत नाही”, मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, “तुमची राजकीय चिखलफेक…”

मलायका मोठी आहे, तर अर्जुन लहान आहे. त्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. बऱ्याचदा अर्जुन व मलायका ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असतात. एकदा तर मलायका अरोराच्या गरोदरपणाचे वृत्तही आले होते, ज्यावर अर्जुनने संताप व्यक्त केला होता. अशातच आता एका बॉलीवूड अभिनेत्याने अर्जुनवर जोरदार टीका केली आहे. त्याचं करिअर संपलंय त्यामुळे तो मलायका अरोराची सेवा करत आहे, असं केआरकेने म्हटलं आहे.

“…म्हणून आम्ही मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” ‘बाईपण भारी देवा’मधील मराठमोळ्या सुकन्या मोनेंचा खुलासा

“मी अर्जुन कपूरला म्हटलं होतं की जर तू अभिनेता बनू शकलास तर प्रत्येक भारतीय सुपरस्टार होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या ५ वर्षात तुझं करिअर संपेल, असा मला विश्वास आहे. आज अर्जुन कपूर घरात बसून मलायका अरोराची सेवा करत आहे,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास अर्जुन लवकरच भूमी पेडणेकरबरोबर नुआ शैलीच्या थ्रिलर ‘द लेडीकिलर’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगसोबत एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम करत आहे.

Story img Loader