बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी आणि रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही भूमिका आहेत.

शाहिदचा हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान यांनी थेट OTT वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर टीका केली आहे. ट्वीट करत केआरकेने शाहिदची जोरदार खिल्ली उडवली आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,
Tharla Tar Mag Serial New Track
‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन वळण! सायलीचा लूकही बदलला; मधुभाऊंनी लेकीसाठी घेतला कठोर निर्णय…; पाहा प्रोमो

शाहिद कपूरची खिल्ली उडवत कमाल रशीद खान यांनी लिहिले की आता एका लेटेस्ट ट्वीटमध्ये केआरकेनं शाहिद कपूरची चांगलीच खिल्ली उडवली आहे. केआरकेनं लिहिलं आहे,”JioCinema वर शाहिदचा नवा सिनेमा #BloodyDaddy स्ट्रीम होणार आहे. मग लोक त्याच्या कोणत्या सिनेमाला थिएटरमध्ये पाहण्यासाठी तिकिट का खरेदी करतील? मला तर वाटतं शाहिदचं करिअर आता संपलं आहे. त्याच्या पुढच्या सिनेमाला सिनेमागृहात १ करोडची देखील ओपनिंग मिळणार नाही”.

शाहिदचा हा चित्रपट ओटीटी माध्यमावर ९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर तुम्ही हा चित्रपट विनामूल्य पाहू शकता. शाहिदने ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये, “वन हेल ऑफ ब्लडी नाईट…” असे लिहिले आहे. ‘ब्लडी डॅडी’च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर दमदार अ‍ॅक्शन आणि फायरिंग करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना रोमॅंटिक हिरो, चॉकलेट बॉय याव्यतिरिक्त शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा- Video : सैफ अली खानचा ‘हा’ लूक पाहून नेटकऱ्यांनी केली मलायका अरोराशी तुलना; व्हिडीओ व्हायरल

‘ब्लडी डॅडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यामागच्या कारणाचा शाहिदने खुलासा केला आहे. शाहिद म्हणाला, तीन वर्षांपासून आम्ही या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित करण्याची योजना बनवत आहोत. अनेक लोकांना मला विचारले की हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये का प्रदर्शित केला नाही. पण हा चित्रपट ओटीटीसाठी डिझाईन करण्यात आला असल्याचे शाहिदने सांगितले.

शाहिद कपूर राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर वेब सीरिज ‘फर्जी’ मध्ये शेवटचा दिसला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. याआधी तो ‘जर्सी’ या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसला होता. यात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. आता शाहिद क्रिती सेनॉनबरोबर एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही.

Story img Loader