हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी पहाटे इस्रायलवर अचानक हल्ला केला. तेव्हापासून सीमेवर हमास व इस्रायलच्या लष्करादरम्यान युद्ध सुरू आहे. हमास इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत एक हजारहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. इतकंच नाही तर इस्रायलची मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. अशातच या परिस्थितीचा उल्लेख करत बॉलीवूड अभिनेत्याने विवेक अग्निहोत्रींवर टीका केली आहे.
हमासने इस्रायलवर हल्ला का केला? अमेरिकेने सांगितलं मोठं कारण
इस्रायलमधील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता केआरकेने विवेक अग्निहोत्रींना टोला लगावला आहे. “मंगळ ग्रहावर द व्हॅक्सिन वॉर प्रदर्शित करण्यासाठी, त्याचे अधिकार मिळवण्यासाठी इस्रायल आणि हमास युद्ध लढत आहेत. अशा सन्मानाबद्दल विवेक अग्निहोत्रींना अभिमान वाटला पाहिजे,” असं म्हणत केआरकेने विवेक अग्निहोत्रींची खिल्ली उडवली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. यावरून केआरकेने विवेक अग्निहोत्रींना टोला लगावला.
‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट १० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. हा चित्रपट करोना काळात स्वदेशी लसची निर्मिती करणाऱ्या डॉक्टरांची कहाणी सांगतो. यात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. तर, पल्लवी जोशी, रायमा सेन, गिरीजा ओक गोडबोले यांच्याही भूमिका आहेत.