शाहरुख खानचा पठाण हा घोषणेपासूनच प्रचंड चर्चेत होता. प्रदर्शन आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर आता हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाने मोठाच गल्ला जमवला. या चित्रपटाचे जितकं कौतुक होत आहे तितकीच काही जणांकडून याच्यावर टीकाही केली जात आहे. आता एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पठाणाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५७ कोटींची कमाई केली. तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरातून कमाईचा शंभर कोटींचा आकडा ही पार केला होता. प्रेक्षकांबरोबरच अनेक बॉलिवूड कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी देखील या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. या चित्रपटाच्या यशामुळे अनेक बॉलिवूड कलाकार आणि निर्माते भारावून गेले. पण आता ‘पठाण’ हा एक बॉलिवूड चित्रपट असल्याने सर्व बॉलिवूड स्वतःला प्रतिष्ठित समजू लागलं आहे अशा शब्दात कमाल आर खान याने बॉलिवूडवर टीका केली आहे.

आणखी वाचा : Pathaan Box Office Collection: दुसऱ्याच आठवड्यात ‘पठाण’ची क्रेझ झाली कमी? १५व्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

कमाल आर खान म्हणजेच केआरके हा त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा बॉलिवूडवर निशाणा साधला होता. तर आता एक ट्वीट करत त्याने पुन्हा एकदा संपूर्ण बॉलीवूडला लक्ष्य केलं आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, “एक पठाण चित्रपट काय हिट काय झाला तर बॉलिवूडमधला प्रत्येक भुक्कड स्वत:ला प्रतिष्ठित समजायला लागला. तुम्ही सगळे किती मोठे हुशार आहात हे फेब्रुवारीच्या अखेरीसच स्पष्ट होईल.”

हेही वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

केआरकेचं हे ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. आता त्याच्या या ट्वीटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर काहींनी त्याची बाजू घेऊन कमेंट केली, तर काहींनी या ट्विट मुळे केआरकेलाच ट्रोल केलं आहे. आता या ट्वीटमुळे केआरकेकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधलं गेलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk wrote a tweet against bollywood got viral on social media rnv
Show comments