बॉलिवूडमध्ये स्वतःच्या बळावर आपला ठसा उमटवणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांच्या यादीत अभिनेत्री कृतिका कामरा हिचेही नाव येते. कृतिका कामराने अभिनेता करण कुंद्रासोबत ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेत काम करत सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले. आज तिचे नाव एक टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून घेतले जाते. अशातच आता तिने घराणेशाहीबद्दलचे तिचे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “हा तर उर्फी जावेदचा प्रभाव!”; भूमी पेडणेकरची अजब ड्रेसिंग स्टाईल बघून नेटकरी गोंधळले

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी कृतिका कामरा आज बी-टाऊनचा एक महत्वाचा भाग बनली आहे. कृतिका कामरा नुकतीच ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’च्या ‘हुश हुश’ या वेब सीरिजमध्ये दिसली. दरम्यान, एका मुलाखतीत कृतिका कामरा हिने इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

कृतिका कामरा म्हणाली, “प्रत्येक क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातही घराणेशाही आणि भेदभावाचा प्रवाह आहे. मला कधीही घराणेशाहीमुळे वाईट अनुभव आला नाही. मला माझ्या क्षमतेनुसार संधी मिळाल्या आहेत. पण काही वेळा मला असं वाटलं की, जी पात्रं माझ्या वाट्याला यायला हवी होती ती दुसऱ्या अभिनेत्रींना दिली गेली. निर्मात्यांच्या मनात स्टारकिड्सबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. मी बहुतेक निर्मात्यांना ते आधीपासून ओळखत असलेल्या कलाकारांबरोबर काम करताना पाहिले आहे. त्यामुळे आउटसाईडर्सना कास्टिंगमध्ये अनेक अडचणी येत आहेत. याला कसे सामोरे जावे हे मला माहित नाही. फक्त आपण घराणेशाहीला बळी पडणार नाही यापासून स्वतःला जपलं पाहिजे.”

हेही वाचा : Video : जुही चावला करणार ओटीटी विश्वात पदार्पण, नवीन थ्रिलर वेबसीरिज ‘हश हश’चा ट्रेलर प्रदर्शित

२०१८ मध्ये निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीच्या ‘मित्रों’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘तांडव’ आणि ‘हुश हुश’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम करत कृतिकाने सैफ अली खान आणि जुही चावला सारख्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krutika kamra expressed her opinion about nepotism in bollywood rnv
Show comments