हिंदी चित्रपट संगीतविश्वात स्वतःचं असं स्थान निर्माण करणाऱ्या कुमार सानू या गायकाला कुणी ओळखत नाही अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. खासकरून ९० च्या दशकातील लोकांना तर कुमार सानू यांचं महत्त्व चांगलंच ठाऊक आहे. याच काळात कुमार सानूच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनुभवली आणि अल्पावधीतच तो आवाज कित्येकांचा लाडका झाला. पार्श्वगायक म्हणून कुमार सानू यांनी कित्येक मोठमोठ्या स्टार्सना आवाज दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीत क्षेत्राशी जोडलेल्या असलेल्या कुटुंबात कोलकातामध्ये जन्मलेल्या कुमार सानू यांना १९९० ‘आशिकी’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील सगळीच गाणी सुपरहीट ठरली आणि कुमार सानू हे नाव प्रत्येकाच्या ओठावर येऊ लागलं. पार्श्वगायन या क्षेत्रात ३५ वर्षांची कारकीर्द पूर्ण करणाऱ्या कुमार सानू यांनी नुकतंच सध्याच्या चित्रपट संगीताविषयी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : Video : सयाजी शिंदेंची हटके भूमिका, नागराज मंजुळे यांचा डॅशिंग अवतार; बहुचर्चित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कुमार सानू यांनी या गोष्टीचा खुलासा केला. कुमार सानू म्हणाले, “मी माझी गाणी फारशी ऐकत नाही, कुणी सहज लावली असतील तरच ती कानावर पडतात नाहीतर मला त्यात चुका सापडतात. मी सध्या काही इंग्रजी गाणी आवर्जून ऐकतो, पण हिंदी गाणी मी अजिबात ऐकत नाही. किंबहुना सध्याची हिंदी गाणी ही ऐकण्यायोग्यही नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे मी ती गाणी फारशी ऐकत नाही आणि मला त्याबद्दल जास्त माहितीही नसते.”

कुमार सानू यांनी शाहरुख खान सलमान खानसारख्या मोठमोठ्या सुपरस्टार्सना आवाज दिला. याबरोबरच त्यांनी जतिन-ललित, अनू मलिक, नदीम-श्रवणसारख्या कित्येक दिग्गज संगीतकारांबरोबर काम केलं आहे. ‘साजन’, ‘बाजीगर’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘कुली नंबर १ अशा कित्येक चित्रपटातील कुमार सानू यांची गाणी आजही लोकांना तोंडपाठ आहेत.