गायक कुमार सानू हे बॉलिवूडला सदाबहार गाणी देण्यासाठी ओळखले जातात. पण त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप कठीण होतं. त्यांनी दोन विवाह केले. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा असून जान कुमार सानू असं त्याचं नाव आहे. तर, त्यांच्या दुसऱ्या पत्नीने एक मुलगी दत्तक घेतली आहे, तिचे नाव शॅनन आहे. शॅननने तिच्या आयुष्याशी संबंधित काही खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सानिया मिर्झाशी घटस्फोट घेण्याच्या चर्चांबाबत अखेर शोएब मलिकने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही दोघेही…”

कुमार सानूंची मुलगी शॅननने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, “मी १४ किंवा १५ वर्षांची असताना सोशल मीडियावर सक्रीय झाले होते. माझ्या पोस्टवर किंवा फोटोंवर काही लोक नकारात्मक, वाईट कमेंट्स करायचे, त्या कमेंट्स मला आवडायच्या नाहीत. यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायची. मी लहान होते, त्यामुळे सोशल मीडियावरील गोष्टी मी मनावर घेतल्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.”

शॅननने सांगितलं की तिचे कुटुंब आणि मित्रांनी त्याला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. तिच्या आयुष्यातील हा एक मोठा धडा होता. “मला नैराश्य किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या लोकांना मदत करायची आहे. आयुष्यात कितीही अंधार असला तरी प्रकाशाची एक किरण नेहमीच येते, असं मला त्यांना सांगायचं आहे,” असं शॅनन म्हणाली.

कुमार सानूंच्या पहिल्या पत्नीचे नाव रीता भट्टाचार्य आहे. कुमार सानूंनी १९८० मध्ये पहिल्या पत्नीशी लग्न केलं होतं पण १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी सलोनीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आहेत, शॅननही दत्तक घेतलेली मुलगी असून दुसऱ्या मुलीचं नाव अॅना आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sanu daughter shannon attempted suicide because of social media trolling hrc