८० च्या दशकापासून कुमार सानू यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही त्यांची कित्येक गाणी पुन्हा रिमेक करून वापरली जात आहेत. कुमार सानू यांनी आजवर २०००० हून अधिक गाणी गायली आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्यावर एवढं प्रेम केलं की एक वेळ अशी होती की केवळ प्रेक्षकांखातर कुमार सानू यांना स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून गावं लागलं होतं.
नुकताच ‘पिंकव्हीला’शी संवाद साधताना कुमार सानू यांनी त्या प्रसंगाची आठवण सांगितली जेव्हा त्यांना आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली अन् त्याच दिवशी त्यांना एका कार्यक्रमात गायचं होतं. त्या कार्यक्रमादरम्यान नेमक्या के भावना कुमार सानू यांच्या मनात होत्या त्या त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : ‘कौन बनेगा करोडपती १५’च्या नावावर होतीये लोकांची फसवणूक; अमिताभ बच्चन यांनी केलं स्पर्धकांना सावध
ते म्हणाले, “द शो मस्ट गो ऑन असं खुद्द राज कपूर यांनी म्हंटलं आहे. जेव्हा तुम्ही हजारो लोकांसमोर उभे राहता तेव्हा त्या प्रेक्षकांना तुमच्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे याच्याशी देणंघेणं नसतं. किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे दुखावले गेले आहात याचंही त्यांना सोयर सूतक नसतं. त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की कुमार सानू आला आहे म्हणजे तो गाणारच. त्यामुळे त्यावेळी मी चेहेऱ्यावर हास्य कायम ठेवत त्यांना सामोरं गेलो आणि गायलो.”
आणखी वाचा : रणबीर कपूर नव्हे तर ‘हा’ दाक्षिणात्य स्टार होता ‘अॅनिमल’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती
त्यावेळी जेव्हा कुमार सानू मंचावर गात होते तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांच्यावर फुलं उधळली ज्यामुळे मंच निसरडा झाला होता. कुमार सानू ही त्यावरून घसरलेसुद्धा पण कुणालाच कसलीच शुद्ध नव्हती. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या गायकाचं गाणं ऐकण्यात गर्क होते. ऋषी कपूरपासून शाहरुख खानपर्यंत कित्येक अभिनेत्यांना कुमार सानू यांनी आवाज दिला.