ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांचे अनेक किस्से आजही त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकलाकारांकडून, दिग्दर्शक-निर्मात्यांकडून वेळोवेळी ऐकायला मिळतात. याबरोबरच, ऋषी कपूर यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये देखील अनेक चित्रपट, कलाकार यांचे किस्से लिहिले आहेत. अनेकदा त्याची चर्चा होताना दिसते. आता दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याविषयी एक आठवण सांगितली आहे. कुणाल कोहली दिग्दर्शित हम तुम चित्रपटाला ऋषी कपूर यांनी सुरूवातीला नकार दिला होता, असा खुलासा करत त्याचे कारणही सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहुण्या कलाकाराची…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुणाल कोहली यांनी म्हटले, “जेव्हा मी ऋषी कपूर यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मी ही भूमिका साकारणार नाही, असे म्हणत नकार दिला. मी त्यांना नकार देण्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी म्हटले की पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. फक्त सात सीन आहेत. मला ही भूमिका करायची नाही. त्यांचे हे मत ऐकल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितले की तुम्ही साकारत असलेल्या भमूकेचा प्रभाव पडणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये घेऊ शकतो, मात्र, त्यामुळे त्याचा प्रभाव राहणार नाही. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला.”

पुढे त्यांनी हम तुम या चित्रपटाबद्दल अधिक बोलताना म्हटले की हा चित्रपट सैफ अली खानसाठीदेखील महत्वाचा ठरला. या चित्रपटाने त्याच्या करिअरला एक वेगळे वळण मिळाले. या चित्रपटाआधी त्याचा एकही चित्रपट हीट ठरला नव्हता. सैफ अली खानबरोबर या चित्रपटात राणी मुखर्जीसुद्धा मुख्य भूमिकेत होती. यश चोप्रांनी मला व आदित्य चोप्राला हा चित्रपट बनविण्यासाठी ७.५ कोटीचे बजेट दिले. त्याच बजेटमध्ये चित्रपट बनविण्यासा सांगतिले. त्यांनी म्हटले होते की यामध्ये चित्रपट बनवायचा असेल तर बनवा नाहीतर बनवू नका.

हम तुम चित्रपटानंतर कुणाल कोहली यांनी यश राज फिल्मबरोबर फना व थोडा प्यार थोडा मॅजिक हे चित्रपट बनवले. फनाह बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये काजोल आमिर खान मुख्य भूमिकेत होते. याबरोबरच, ऋषी कपूरही प्रमुख भूमिकेत होते. तर थोडा प्यार थोडा मॅजिक बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.