Kunickaa Sadanand On Udit Narayan Kiss Controversy: गायक उदित नारायण काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओनंतर टीकेचे धनी ठरले होते. ते लाइव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस करताना दिसले होते. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याबद्दल आता अभिनेत्री व कुमार सानू यांची एक्स गर्लफ्रेंड कुनिका सदानंदने उदित नारायण यांची बाजू घेतली आहे. अशा गोष्टींचा दोष फक्त पुरुषांना देण्यात येतो, तर महिलांना मात्र पुढारलेलं म्हटलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उदित नारायण यांनी किस केले ते बरोबर केले, पण त्यांनी चुकीच्या जागी किस केले. त्यांनी गालावर किस करायला पाहिजे होते”, असं कुनिका म्हणाली. “मी यात कोणालाच दोष देत नाही. पण ती मुलगीही तिथे समोर आली होती ना, मग तुम्ही सगळा दोष उदित नारायण यांच्यावर का टाकला, की तुम्ही किस का केले? तुमच्यासमोर जर थाळीत लाडू सजवून येतील तर तुम्ही खाणार नाही का? हे अजिबात बरोबर नाही. ते उदित नारायण आहेत म्हणून तुम्ही त्यांना विचारताय की तुम्ही किस का केलं?” असं कुनिका म्हणाली.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उदित नारायण यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिसत उदित स्टेजवर ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाताना दिसतात आणि चाहते त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी येत आहेत. पुरुष आणि महिला चाहते तिथे येतात. मग उदित स्टेजवरून पुढे येतात आणि महिलांबरोबर सेल्फी काढतात आणि त्यांच्या गालावर किस करतात. एका चाहतीने त्यांना गालावर किस केल्यावर ते तिच्या ओठांवर किस करतात, हा व्हिडीओ पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा – पाकिस्तानची ‘ऐश्वर्या राय’! २०० बिलियन डॉलर्सची कंपनी सोडली अन्…; भारतीय अभिनेत्रीशी तुलनेबाबत म्हणते…

पाहा व्हिडीओ –

उदित नारायण यांनी दिलेलं स्पष्टीकरण

“चाहते खूप वेडे असतात. आम्ही लोक असे नाही. मी सभ्य माणूस आहे. काही लोक या गोष्टी करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार? गर्दीत खूप लोक असतात, आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळतेय, म्हणून काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी हाताचं चुंबन घेतं. हे सगळं त्यांचं प्रेम आहे. याकडे फार लक्ष देऊ नये,” असं व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना गायक उदित नारायण म्हणाले होते.

हेही वाचा – भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लग्नबंधनात अडकले, लोकप्रिय गायिका आहे पत्नी; पाहा विवाह सोहळ्यातील फोटो

“मला बॉलीवूडमध्ये ४६ वर्षे झाली आहेत, माझी प्रतिमा अशी नाही (की मी चाहत्यांना जबरदस्तीने किस करतो). खरं तर, माझ्या चाहत्यांनी माझ्यावर केलेले प्रेम पाहून मी हात जोडतो, स्टेजवर असताना मी नतमस्तक होतो. अशी वेळ पुन्हा येईल की नाही हा विचार मी करत असतो,” असं उदित यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं होतं.

हेही वाचा – रान्या राव प्रत्येक दुबई ट्रिपमधून कमवायची तब्बल ‘इतके’ रुपये, एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी किती पैसे मिळायचे? तपासात माहिती आली समोर

कुनिका सदानंदने ‘ससुराल सिमर का’, ‘आशीर्वाद’, ‘डॉलर बहू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘तडीपार’, ‘खून का सिंदूर’, ‘दिल ही तो है’ यांसारख्या चित्रपटांचा त्या भाग राहिल्या.