अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असतात. सध्या दोघांचा ब्रेकअपच्या सगळीकडे चर्चा रंगल्या आहेत. मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जून सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या चर्चांवर कुशाने मौन सोडलं आहे.

हेही वाचा- “विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

कृशाने सोशल मीडियावर पोस्ट करत या अफवांवर भाष्य केलं आहे. कृशा म्हणाली, “माझ्याबद्दल दररोज इतका मूर्खपणा वाचल्यानंतर, मला माझा स्वतःचा परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल अशा चुकीच्या गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. नाहीतर तिच्या सोशल लाइफला खूप मोठा धक्का बसेल.”

नुकतीच कुशा आणि अर्जूनला करण जोहरच्या घरी पार्टीत एकत्र दिसले होते. या पार्टीत मलायका अरोरा हजर नव्हती. पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये अर्जुन कुशाकडे पाहत असताना दिसला होता. या फोटोवरुनच दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा-

कृशाबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिने घटस्फोटाची घोषणा केली होती. लग्नानंतर सहा वर्षांनंतर कृशा पती जोरावर सिंग अहलूवालियापासून विभक्त होत आहे. कुशा व जोरावर दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती.