कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता लोकप्रिय कंटेन्ट क्रिएटर आणि अभिनेत्री कुशा कपिला जग स्त्रियांकडे कसे पाहते, घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केल्याने चर्चेत आहे.

काय म्हणाली कुशा कपिला?

कुशा कपिलाने नुकतीच ‘फीवर एफएम’ला मुलाखत दिली. यावेळी तिने स्त्रियांना समाजात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केले आहे. तिने म्हटले आहे, “माझ्या आईने ज्या समस्यांचा सामना केला त्यामुळे मला असे वाटते की, समाज हा स्त्रियांप्रती दयाळू नाही. त्यामुळे मी माझ्या घटस्फोटानंतर कोणतेही मत मांडण्यापासून स्वत:ला दूर ठेवते.”

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…

हेही वाचा: Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने पायावर काढला नवा टॅटू, पाहा व्हिडीओ

कुशा कपिलाने पुढे म्हटले आहे की, माझ्या आईने समजाचा दबाव सहन केला आहे. तिने आपल्या नातेवाईकांबरोबर आणि समाजाबरोबर बोलले पाहिजे होते. तिला तिचे आयुष्य आहे. ती मंदिरात जाईल किंवा पार्कमध्ये जाईल, तिने जोडलेली माणसे आहेत. तिचे स्वत:चे असे संबंध आहेत, जिथे तिला इतरांच्या मतांचा स्वीकार करावा लागतो आणि जग असेच चालते. आपण जिथे राहतो आणि ज्या काळात राहतो, त्याचे हे सत्य आहे. जितकी आपण प्रगती करत आहोत आणि ती होत राहावी अशी आशा आपण करतो. पण, काही गोष्टी तशाच राहतात, त्यात बदल होत नाही.

कुशा कपिलाने ‘ऑनलाइन लाइफ’बद्दल बोलताना म्हटले आहे की, याचा एक पैलू असा आहे की, ऑनलाइन जगात तुमच्याबरोबर काय होईल आणि काय नाही, हे तुम्ही निवडू शकत नाही. खासकरून जेव्हा सोशल मीडियावर तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असाल तर हे मोठ्या प्रमाणात घडते. हे चुकीचे आहे, कठोर आहे, पण काही गृहीतके तयार होतात, लोक तुमच्या बाजूने बोलतात. नंतर तुम्हाला वाटते की, मी याबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहे? काही विषयांची खोली तितकीच असते.

अभिनेत्री ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात अभिनय करताना दिसली होती. ती लवकरच ‘लाइफ हिल गई’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Story img Loader