सध्या काही वर्षांपूर्वी हिट झालेल्या गाण्याचं नवीन व्हर्जन आणण्याचा जमाना आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांची दुसरी व्हर्जन रिलीज झाली आहेत. आता या यादीत आणखीन एका सुपरहिट गाण्याचं नाव सामील होणार आहे. हे गाणं म्हणजे शाहिद कपूरवर चित्रीत झालेलं ‘कमीने’ या चित्रपटातलं ‘धन ते नान.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘धन ते नान’ या गाण्याचं नवीन व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल भारद्वाज आणि लव रंजन यांचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट ‘कुत्ते’ या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हे नवीन गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचे निर्माते आता ‘फिर धन ते नान’ गाणे लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

या गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या गाण्याच्या टीझरलाही काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कमीने चित्रपटातील ‘धन ते नान’ या गाण्याप्रमाणेच त्याचं नवीन व्हर्जनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

हेही वाचा : “१० वर्षं मेहनत…” अर्जुन कपूरने सांगितला ‘कुत्ते’ चित्रपटात दिग्गज कलाकारांसह काम करण्याचा अनुभव

दरम्यान आसमान भारद्वाज दिग्दर्शित, अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कुत्ते’हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच, आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित ‘कुत्ते’या चित्रपटातून आसमान भारद्वाज दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.