Laila Majnu Re-Release box office collection : ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा (Triptii Dimri) ‘लैला मजनू’ नावाचा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. इम्तियाज अली व एकता कपूरच्या या चित्रपटात तृप्ती डिमरी व अविनाश तिवारी (Avinash Tiwary) मुख्य भूमिकेत होते. साजिद अलीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण आता सहा वर्षांनी तो पुन्हा प्रदर्शित झाला असून त्याचे कमाईचे आकडे चकित करणारे आहेत.

२०२४ मध्ये ‘रॉकस्टार’ पुन्हा रिलीज केल्यानंतर इम्तियाज अली आणि त्यांच्या टीमने ‘लैला मजनू’ला पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी नॅशनल सिनेमा सीरिजबरोबर भागीदारी केली. हा चित्रपट सर्वात आधी काश्मीरमधील एकाच सिनेमागृहात रिलीज करण्यात आला, तिथे त्याला स्थानिक प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सकारात्मक प्रतिसादामुळे भारावलेल्या निर्मात्यांनी लगेचच संपूर्ण भारतातील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं.

ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

१० वर्षांपूर्वी केलं लग्न, पण प्रसिद्ध अभिनेत्रीला होत नाहीये बाळ; म्हणाली, “माझ्या आणि परागच्या वयात खूप…”

दोन दिवसांची कमाई

आश्चर्याची गोष्ट अशी की २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली होती. आता ९ ऑगस्ट रोजी पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक मिळत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, ‘लैला मजनू’ने ९ ऑगस्ट रोजी ३० लाख रुपयांची ओपनिंग केली, त्यानंतर शनिवारी ११० टक्के वाढीसह ७० लाख रुपयांची कमाई केली. चित्रपटाची दोन दिवसांत एकूण कमाई एक कोटी रुपये झाली आहे.

triptii dimri
अभिनेत्री तृप्ती डिमरी (फोटो – इन्स्टाग्राम)

“मी धूममध्ये किसिंग सीन केला तेव्हा…”, ऐश्वर्या रायने हृतिक रोशनबरोबरच्या सीनवर दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया

चित्रपटाचे बजेट व २०१८ मधील एकूण कलेक्शन

Laila Majnu budget: रविवारसाठी तिकीटांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे हा चित्रपट रविवारी एक कोटींच्या आसपास कमाई करण्याचा अंदाज आहे, पण त्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटाचे बजेट १० कोटी रुपये होतं. २०१८ मध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने फक्त तीन कोटी रुपयांची कमाई केली होती. पुन्हा प्रदर्शित केल्यावर दोन दिवसांत चित्रपटाने एक कोटी कमावले आहेत, प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल, असा अंदाज आहे.

दाक्षिणात्य चित्रपट आवडतात, मग तुम्ही बघितलेत का हे सस्पेन्स-थ्रिलर सिनेमे? OTTवर आहेत उपलब्ध

लैला व कैस यांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यामध्ये सुमित कौल, साहिबा बाली, दुवा भट्ट, अबरार काझी या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘लैला मजनू’ हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.