बॉलीवूडचा सुपस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच आर्यनने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी आर्यनने एक जाहिरात दिग्दर्शित केली होती. या जाहिरातीत शाहरुख खानने काम केलं होतं. आता आर्यन खान दिग्दर्शित ‘स्टारडम’ नावाची वेब सीरिज लवकरच येत आहे. या वेब सीरिजसाठी मुख्य अभिनेत्याची निवडही करण्यात आली आहे.

हेही वाचा- “ती मला सारखं…”; प्रियांका चोप्राबरोबर झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने सांगितल कारण, म्हणाला…

PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल

आर्यन दिग्दर्शन करत असलेल्या पहिल्याच वेब सीरिजमध्ये लक्ष्य लालवानीची मुख्य अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या वेब सीरिजसाठी तब्बल ८०० ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर लक्ष्यची निवड करण्यात आली आहे. लक्ष्यने त्याच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. धर्मा प्रॉडक्शच्या ‘दोस्ताना २’ चित्रपटातही त्याला भूमिका मिळाली होती. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका होती. मात्र, या चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर पडल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण तिथेच थांबले. त्यानंतर लक्ष्यला शनाया कपूरच्या ‘बेधक’ची ऑफर देण्यात आली होती.

‘स्टारडम’ वेब सीरिजच्या चित्रीकरणाला या महिन्यापासून सुरुवात होणार होती, परंतु कलाकारांच्या कास्टिंग प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याने शूटिंग काही आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आले आहे. या वेब सीरिजसाठी आणखी तीन कलाकार लवकरच फायनल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेब सीरिजमध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंगचीही भूमिका असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ही वेब सीरिज शाहरुख खान आणि गौरी खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’च्या बॅनरखाली बनवली जाणार आहे.

Story img Loader