बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान काही ना काही कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असते. तिचा पती सैफ अलीखान आणि दोन मुलांना कायमच पहिले प्राधान्य देते. करीना आणि सैफ अली खान यांनी ‘LOC कारगिल’ (२००३) आणि ‘ओंकारा’ (२००६) मध्ये एकत्र काम केले होते. नुकताच तिचा आमिर खान बरोबरच ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला. अपयशाने खचून न जाता करीना कपूर पुन्हा कामाला लागली आहे.

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…

करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ‘पहिला दिवस चित्रपट नंबर ६७. ६८? चला मित्रांनो हे करूयात’ असं म्हणत तिने दिग्दर्शक हंसल मेहता, निर्माती एकता कपूर, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यां टॅग केले आहे. चित्रपटाबद्दलची पूर्ण माहिती काही दिवसात आपल्यासमोर येईलच.

“मला लहानपणापासून मुलींनी…. ” वरूण धवनने आपल्या खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता पहिल्यांदाच करीना कापूरबरोबर काम करणार आहेत. त्यांनी ‘अलिगढ’, ‘छलांग’, ‘ओमेरात’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात करीना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. चित्रीकरणासाठी अभिनेत्री करीना कपूर खान लंडनला रवाना झाली आहे.

करीना कपूर लग्नानंतर मोजक्याच चित्रपटात दिसली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. तिने आपल्या करियरची सुरवात रेफ्युजी चित्रपटातून केली होती. ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘३ इडियट्स’, ‘जब वि मेट’ हे तिचे गाजलेले चित्रपट. लाला सिंग चड्ढानंतर आता तिच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत.

Story img Loader