काही कलाकार हे सदैव आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आपल्या सहज अभिनयाने काही भूमिका अजरामर करतात, अशा कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असतो. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आहेत.

बॉलीवूडमधील ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. ‘बॉबी’ चित्रपटातील राज ही भूमिका, ‘प्रेम रोग’ चित्रपटातील देव ही भूमिका आणि ‘सरगम’ चित्रपटातील राजू ही भूमिका प्रेक्षकांच्या अद्याप लक्षात आहे.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन जेवायला उत्तरेकडे तोंड करून का बसतात? हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलेली आठवण, म्हणालेले…
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

काय म्हणालेले ऋषी कपूर?

ऋषी कपूर यांनी १९७३ मध्ये ‘बॉबी’ चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. याच वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातून अँग्री यंग मॅन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. फार वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी माझे करिअर घडवत असताना मला अमिताभ बच्चन या वादळाचा सामना करावा लागला, असे वक्तव्य केले होते.

फार वर्षांपूर्वी ‘इंडिया टीव्ही’ला ऋषी कपूर यांनी मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले होते, “मी अमिताभ बच्चन नावाच्या वादळाचा सामना करत होतो. तो त्याचा काळ होता, अँग्री यंग मॅनचा काळ होता. त्यावेळी सगळे नायक अॅक्शन फिल्म करत होते. बंदूक आणि शस्त्रे यांच्यासह पोस्टरवर येत होते. मी मात्र गरीब माणूस हातात गिटार घेऊन उभारलेला असायचो. लोक मला गाण्यांसाठी आणि डान्ससाठी ओळखू लागले. पण, मला माझी ओळख अशी कधीच नको होती. मला माझी ओळख एक कलाकार म्हणून पाहिजे होती, जो त्याच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.”

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकातदेखील याविषयी लिहिले आहे. त्या काळात सगळ्यांनाच अॅक्शन चित्रपट बनवायचे असत. त्यामुळे जो नायक अँग्री मॅनच्या भूमिकेत दिसणार, त्याला जास्त भाग मिळायचा. ‘कभी कभी’ हा रोमँटिक चित्रपट वगळता इतर कोणत्याही अनेक नायक असलेल्या चित्रपटात लेखकाने माझ्यासाठी समर्थक भूमिका लिहिली नाही. लेखक आणि दिग्दर्शकांनी शक्तिशाली, महत्त्वाच्या भूमिका कायम अमिताभ बच्चनसाठी राखून ठेवल्या. याचा सामना फक्त मी एकट्याने केला नाही, तर शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, विनोद खन्ना यांनीदेखील केला आहे. त्यानेदेखील आपल्या सहकलाकारांना कधीही श्रेय दिले नाही. सलीम-जावेद, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा आणि रमेश सिप्पी या लेखक आणि दिग्दर्शकांना त्याने श्रेय दिले आहे.

हेही वाचा: IC 814 – The Kandahar Hijack : कंदहार विमानाच्या अपहरणकर्त्यांची खरी नावं काय होती? भोला, शंकर नावांशी काय संबंध?

दरम्यान, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांतून एकत्र काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’ , ‘कुली’ आणि ‘अजूबा’ अशा अनेक चित्रपटांत या दोन दिग्गज अभिनेत्यांनी एकत्र काम केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले होते. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केलेला ‘१०२ नॉट आऊट’ हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. २७ वर्षांनंतर त्यांनी एकत्र काम केले होते. ३४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०२.८२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये निधन झाले.

Story img Loader