Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९ मार्चला निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.

सतीश कौशिक यांच्यामागे पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. शशी कौशिक यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर कौशिक यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. परंतु, १९९६ मध्ये दुसऱ्या वर्षी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. यामुळे कौशिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. २०११ मध्ये ५६ व्या वर्षी कौशिक पुन्हा वडील झाले. सरोगसीच्या मदतीने त्यांना वंशिका ही मुलगी झाली.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”

हेही वाचा>> Video: ‘असे’ होते सतीश कौशिक यांचे शेवटचे क्षण, होळीच्या पार्टीमधील ‘तो’ व्हिडीओ समोर

हेही वाचा>> Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

कौशिक आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे. तिच्याबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचे. कौशिक यांना आपल्या मुलीला मोठं आणि यशस्वी होताना पाहायचं होतं. सतीश कौशिक यांचे मित्र निर्माते रुफी जाफरी यांनी याबाबत ईटाइम्सशी बोलताना भाष्य केलं. रुफी म्हणाले, “माझी पत्नी व वंशिकाचं फार जवळचं नातं आहे. सतीश कौशिकच्या निधनाची बातमी मिळताच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर माझ्या पत्नीने वंशिकाला जवळ घेऊन मिठी मारुन बसली होती. सतीशचं निधन झालंय यावर आमचा विश्वासच बसत नव्हता”.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्तांना लग्नाची मागणी घातल्यानंतर ‘अशी’ होती त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया, स्वतःच केलेला खुलासा

पुढे ते म्हणाले, “मी व सतीश गेल्या ३० वर्षांपासून मित्र आहोत. सतीश त्याच्या स्वास्थाकडे पूर्णपणे लक्ष द्यायचा. तो नियमित व्यायाम करायचा. मॉर्निंग वॉकला जायचा. वेळेत जेवण करायचा. मुलीसाठी त्यांना खूप आयुष्य जगायचं होतं. तिला यशस्वी होताना त्याला पाहायचं होतं. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळचं होतं”.

Story img Loader