सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा ९ मार्चला निधन झालं. हृदविकाराचा झटका आल्याने ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौशिक यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या अचानक जाण्याने कौशिक यांच्या कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौशिक यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी कित्येक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. ‘सतीश कौशिक एंटरटेनमेंट’ ही निर्मिती कंपनी त्यांनी सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची मालकी कोणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कौशिक यांचा पुतण्या निशांत कौशिक यांनी माहिती दिली आहे. आजतकला दिलेल्या प्रतिक्रियेत निशांत कौशिक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा>> Video: “सात समुंदर…” गाण्यावर अनन्यासह थिरकले चंकी पांडे, बापलेकीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> शत्रुघ्न सिन्हांबरोबर अफेअर, पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न अन्…; रीना रॉयशी घटस्फोटाच्या ३३ वर्षांनंतर मोहसिन खान यांनी सोडलं मौन, म्हणाले…

निशांत कौशिक म्हणाले, “कौशिक यांनी मला पुतण्या नाही तर मुलगा मानलं होतं. वडिलांप्रमाणेच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. करिअरसाठी त्यांनीच मला मार्गदर्शनही केलं. त्यांनी मला सतीश कौशिक एंटरटेनमेंट कंपनीचा निर्माता केलं होतं. तिथूनच माझ्या करिअरला सुरुवात झाली. मनोरंजन विश्वातील अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या होत्या”.

हेही वाचा>> स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो व्हायरल, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

“सतीश कौशिक यांची स्वप्न पूर्ण करणं ही आता माझी जबाबदारी आहे. त्यांची पत्नी व माझी काकी शशी कौशिक यांच्याकडे या निर्माती कंपनीची मालकी असेल. कौशिक काकांबरोबर जसं काम करायचो तसंच मी माझ्या काकीबरोबरही करेन. आम्ही अनेक चित्रपटांची निर्मिती करणार आहोत. लवकरच या चित्रपटांची घोषणा करण्यात येईल. शशी कौशिक यांना हे कामकाज समजून घेण्यास थोडा वेळ लागेल. पण यात मी त्यांची सर्वप्रकारे मदत करेन”, असंही ते पुढे म्हणाले. कौशिक यांच्या निधनानंतर पत्नी शशी कौशिक व त्यांची १० वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late actor satish kaushik wife shahi kaushik will be chairperson of his producing company kak