बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग अभिनेते दिलीप कुमार यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोकाकुल झाली. दिलीप कुमार यांना आजही त्यांचे चाहते विसरले नाहीत. दिलीप कुमार यांच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. दिलीप कुमार यांची बहीण फरीदा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांच्या अहवालानुसार फरीदा गेल्या ७ दिवसांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे. सायरा बानोही त्यांची काळजी घेत असल्याचे वृत्त आहे. सायरा बानोची तब्येत ठीक नाही, तरीही त्या सतत फरिदाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि डॉक्टरांकडून त्यांची चौकशी करत आहेत.

मेहुण्यानंतर आता सलमानची भाची करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाबरोबर करणार काम

दिलीप कुमार आणि फरिदाचा पुतण्या साकिब जो मेहबूब खान (सईदाचा मुलगा) यांचा नातू आहे, हे देखील फरिदाची काळजी घेत आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो प्रत्येकाची काळजी घेत आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची प्रेमकहाणी सगळ्यांना ठाऊक आहे. शाहरुख खान या कुटुंबाच्या जवळ आहे. तोदेखील यांची चौकशी करत असतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late bollywood actor dilip kumar sister farida hospitalized saira banu taking care spg