दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला १० वर्षे झाली आहेत. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. मुलीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – १० वर्षांनी मिळणार अभिनेत्री जिया खानला न्याय; राहत्या घरी गळफास घेत केलेली आत्महत्या, नेमकं प्रकरण होतं तरी काय?

राबिया खान यांच्या म्हणण्यानुसार, जियाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली होती. ३ जून २०१३ रोजी २५ वर्षीय जियाचा मृतदेह तिच्या जुहू येथील घरातून सापडला होता. राबिया यांनी सूरजविरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सूरजला अटकही केली होती. त्यानंतर १० वर्षे तपास सुरू होता. या प्रकरणात सीबीआयने हस्तक्षेप केला होता. आता एका दशकानंतर कोर्टात सुनावणी होणार आहे. आज २८ एप्रिल रोजी स्पेशल सीबीआय कोर्ट याप्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे.

बदकासारख्या चालीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मलायका अरोराचं स्पष्ट उत्तर; नितंबांचा उल्लेख करत म्हणाली…

गर्भवती होती जिया खान

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही सादर केले होते. २०१३ मध्ये आत्महत्येपूर्वी ती गर्भवती होती, असा दावा करण्यात आला होता. तिचा प्रियकर सूरज पांचोली याने तिला गर्भपातासाठी औषध देऊन शौचालयात गर्भ फ्लश केल्याचा दावाही करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, जियाला चार आठवड्यांनंतर तिच्या गरोदरपणाबद्दल कळलं होतं, तर सूरजला हा प्रकार कळताच तो तिला गर्भपातासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेला. जियाला तेथून गर्भपातासाठी काही औषधेही दिली गेली होती. ‘एबीपी लाइव्ह’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

जियाने लिहिलेली सुसाईड नोट

आत्महत्येपूर्वी जिया खानने सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात तिने तिला होणारा त्रास सांगितला होता. “आता गमावण्यासारखे काही उरले नाही म्हणूनच सर्व काही सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. असो, मी आधीच सर्व काही गमावले आहे. जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ असा आहे की मी निघून आहे किंवा जाण्याच्या तयारीत आहे. मी आतून तुटले आहे. तुझ्या प्रेमात मी स्वतःला पूर्णपणे विसरले, पण तूच मला त्रास देत राहिलास. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, स्वतःला विसरले, पण तू मला उद्ध्वस्त केलंस. आता मला माझ्या आयुष्यात प्रकाश दिसत नाही. सकाळी डोळे उघडले की बेडवरून उठावेसे वाटत नाही. मी माझं भविष्य तुझ्याबरोबर पाहायचे, आपण एकत्र राहू अशी आशा मला होती. पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस,” असं जियाने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.