अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लवकरच रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. गेले कित्येक दिवस प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.

मध्यंतरी या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा ११ ऑगस्टला ‘गदर २’ आणि ‘ओह माय गॉड २’ यांच्याबरोबर प्रदर्शित होणार होता, पण नंतर मात्र याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shiva
Video: आशू भर मंडपात शिवाबरोबरच्या घटस्फोटाचे पेपर फाडणार तर सारंग सावलीला…; मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट, पाहा
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट
Paaru
Video: “माझ्या रूममध्ये त्या दिवशी…”, प्रितमच्या खुलाशानंतर आदित्य अनुष्काला जाब विचारणार; ‘पारू’ मालिकेत नेमकं काय घडणार?

आणखी वाचा : “जवान संसदेत दाखवणार का?” जयराम रमेश यांचा मोदी सरकारला सवाल; किंग खानच्या चित्रपटाला राजकीय रंग

याची तारीख पुढे ढकलल्यापासून याबाबत कोणतीच नवीन माहिती समोर आली नाहीये. नुकतंच ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाच्या टीझर संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार येत्या २८ सप्टेंबरला ‘अ‍ॅनिमल’चा टीझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा वाढदिवस असतो, त्यामुळे अ‍ॅनिमलची टीम याच दिवसापासून चित्रपटाचं प्रमोशन सुरू करू शकते. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी हे सध्या टीझर कट करण्यावर काम करत आहेत.

अद्याप याबद्दल कुणीही पुष्टी केलेली नसली तरी रणबीरच्या वाढदिवशी या चित्रपटाशी निगडीत नवी अपडेट समोर येऊ शकते असं सांगितलं जात आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरच्या कारकीर्दीतील सर्वात हिंसक असा चित्रपट असणार आहे ज्याची छोटीशी झलक आपल्याला प्री-टीझरमधून मिळाली. रणबीरच्या आत्तापर्यंतच्या कामापेक्षा ही भूमिका फारच वेगळी असणार आहे.

Story img Loader