नोव्हेंबर २०२२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया-रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. तर राहाला जन्म दिल्यानंतर काहीच दिवसात तिने पुन्हा एकदा वर्कआउट आणि योगा करायला सुरुवात केली होती. आता तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. इतकं की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याचप्रमाणे ती फिटनेस फ्रिकही आहे. तिच्या आरोग्याकडे, तिच्या आहाराकडे ती नेहमीच लक्ष देत असते. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरून तिने तिचे अनेक वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जाती अगदी २५ शीतली तरुणी दिसत आहे.
आणखी वाचा : आलिया भट्ट पुन्हा गरोदर? फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “२.०…”
आलियाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गाडीतून उतरून जिममध्ये जाताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा हूडी घातला आहे. ती गाडीतून उतरल्यावर मीडिया फोटोग्राफर्सनी तिच्याकडे फोटोसाठी पोस्ट देण्याची मागणी केली. आलियाने देखील ही मागणी हसत हसत मान्य केली. तिने उभे राहून फोटोग्राफर्सना पोज दिली आणि मग ती तिच्या जिममध्ये गेली. या व्हिडीओमध्ये आलियामधील ट्रान्सफॉर्मेशन स्पष्ट दिसून येत आहे.
आता तिचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला असून त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्यात झालेल्या या बदलाचं खूप कौतुक केलं. तर अनेक जणांनी “पटकन तिला ओळखलंच नाही” असंही कमेंट करून सांगितलं. त्यामुळे आलिया आता तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आली आहे.