बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. मध्यंतरी तिचं नाव क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर अजूनही उर्वशीच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टचा संबंध ऋषभ पंतशी लावत असतात. नुकताच उर्वशीने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला, तो पाहून पुन्हा एकदा तिचं नाव ऋषभ पंतशी जोडलं गेलं आहे.

आणखी वाचा : दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सोनम कपूर वर्कआऊटचा शुभारंभ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एकीकडे मेलबर्न शहरात भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना सुरू आहे. अशातच उर्वशीची पोस्ट चर्चेत आली आहे. तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडिओत ती एक जाहिरात करत आहे. मात्र या जाहिरातीत तिने घातलेल्या चेनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : ‘आय लव्ह यू’ म्हणतानाच्या व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाचं स्पष्टीकरण, म्हणाली “तो व्हिडीओ…”

ही चेन पाहून लोकांना पुन्हा वकदा ऋषभ पंतची आठवण झाली आहे. उर्वशी रौतेलाने गळ्यात घातलेली चेन ही हीऋषभची आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. तिच्या या व्हिडिओनंतर अनेकांनी त्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट ऋषभच्या जुन्या फोटोबरोबर जोडला. या दोन्ही फोटोंमध्ये दोघांनी परिधान केलेल्या चेन सारख्याच दिसत आहेत. त्यावरून ती चेन उर्वशीची नसून ऋषभची आहे असं नेटकरी म्हणत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून ही चेन ऋषभची आहे की उर्वशीची?, जर ती ऋषभची असेल तर ती उर्वशीकडे कशी? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

Story img Loader