विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची ( Chhaava Movie ) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली कथा प्रेक्षकांचा खूप भावली आहे. त्यामुळे प्रेक्षक अजूनही आवर्जुन ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई करत आहे. भारतात आणि परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जगभरातून ६०० कोटींहून अधिक कमाई ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच दुसऱ्याबाजूला एका व्हिडीओची खूप चर्चा होतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीबने अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये लॉरेन व रोहित गिजारे यांच्या टीमने ‘छावा’ चित्रपटातील ‘आया रे तुफान’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यामध्ये २० डान्सरने ए.आर. रेहमान यांच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला असून या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या डान्सचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होतं आहे.

टाइम्स स्क्वेअरजवळील २० डान्सरच्या या व्हिडीओला आतापर्यंत २.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं असून ४ हजारांहून अधिक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. याआधीही टाइम्स स्क्वेअरवर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर झळकला होता. याचा व्हिडीओ मॅडॉकने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

दरम्यान, मॅडॉक निर्मित ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, दिव्या दत्त, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने देशांर्गत आतापर्यंत ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.