‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट अजूनही थिएटर्समध्ये चालतोय. ‘छावा’ विकी कौशलच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. इतकंच नाही तर हा यंदाचा सर्वाधिक करणारा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.

‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तब्बल ४ वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचे बलिदान या सिनेमात पाहायला मिळते. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिस गाजवलं. तब्बल २५ दिवसांनंतरही हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वीरित्या चालतोय.

‘छावा’मध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. औरंगजेबाची भूमिका बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्नाने साकारली असून कवी कलश या भूमिकेत अभिनेता विनीत कुमार सिंह आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाने सिनेमागृहात उत्तम कामगिरी केली असून ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडला आहे.

विकी कौशलच्या ‘छावा’ने ‘बाहुबली २’ च्या हिंदीतील कलेक्शनला मागे टाकले आहे. आता ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सहावा हिंदी चित्रपट ठरला आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, २५ दिवसांनंतर ‘छावा’चे भारतातील कलेक्शन ५१७.१८ कोटी रुपये झाले आहे. यापैकी ८.२५ कोटी रुपये ‘छावा’ने तेलुगू भाषेत कमावले आहेत. प्रभासच्या ‘बाहुबली २’ने २०१७ मध्ये ५११ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने ५२४.५३ कोटी रुपयांची कमाई केली आणि ‘गदर २’ ने हिंदीमध्ये ५२५.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘पुष्पा २: द रुल’ हा ८३५.३६ कोटी रुपयांसह सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे.

बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 8 हिंदी चित्रपटांची यादी

पुष्पा 2 हिंदी: ८३५.३६ कोटी
स्त्री 2: ६२५.२७ कोटी
जवान : ५८४ कोटी रुपये
गदर 2: ५२५.७ कोटी
पठाण: ५२४.५३ कोटी
छावा: ५१७.१८ कोटी
बाहुबली 2 हिंदी: ५११ कोटी रुपये
अॅनिमल: ५०५ कोटी

Story img Loader