प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना अनेक वर्ष भारावून टाकले आहे. आशा भोसले यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर इतकी लोकप्रियता कोणाला मिळाली असेल तर ती आशा भोसले यांनाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजच्या तरुण पिढीलाही अशा भोसले यांचा आवाज प्रचंड आवडतो यातच त्यांची एक उत्कृष्ट गायिका म्हणून जीत आहे. गेली कित्येक वर्षं आशा भोसले या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत, लाखो गाणी त्यांनी रेकॉर्ड केली आहेत, कित्येक संगीतकार तसेच दिग्दर्शक यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. नुकतंच या चित्रपटसृष्टीबद्दल एक वक्तव्य केल्याने आशा भोसले चर्चेत आल्या आहेत.

आणखी वाचा : ए सर्टिफिकेट असूनही ‘या’ देशात लहान मुलांनाही पाहता येणार ‘ओह माय गॉड २’; अक्षयच्या चित्रपटाची विदेशातही चर्चा

नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान मीडियाशी संवाद साधताना आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, “चित्रपटसृष्टीचा खरा इतिहास फक्त मला ठाऊक आहे. कित्येक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक यांच्या कित्येक कहाण्या मला ठाऊक आहे. आता सांगायला घेतलं तर ३ ते ४ दिवस लागतील. मी काहीही विसरलेली नाही. या चित्रपटसृष्टीची मी शेवटची मुघल आहे.”

आशा भोसले यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली काही लोकांनी आशा भोसले यांच्या या अफाट कारकिर्दीला सलाम केला आहे तर काही लोकांनी आशा भोसले यांच्या या वक्तव्यावर टीकादेखील केली आहे. बरोबर एका महिन्याने म्हणजेच ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशा भोसले ह्या ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आजही चित्रपटसृष्टीत आशा भोसले यांच्या बोलण्याला प्रचंड महत्त्व आहे.