बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘टायगर ३’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद दिला असून सलमानचे चाहते त्याच्या या दमदार कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

‘लेके प्रभू का नाम’ हे ‘टायगर ३’मधील पहिले गाणे २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला असून सलमानचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. या गाण्यात नेहमीप्रमाणेच सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
salman rushdi the satanic verses in india
The Satanic Verses: बंदीच्या चार दशकांनंतर सलमान रश्दींचं ‘दी सटॅनिक व्हर्सेस’ भारतात परतलं; १९८८ मध्ये जारी केले होते आदेश!

आणखी वाचा : “वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…” निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली खंत

‘टायगर ३’ या चित्रपटाला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे. तर चित्रपटातील हे पहिलं गाणं अरिजित सिंहने गायलं आहे. तब्बल १० वर्षांनी एकमेकांमधले वाद बाजूला ठेवून सर्वप्रथम अरिजितने सलमानसाठी आवाज दिला आहे. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान काही गोष्टींवरुन अरिजीत व सलमानमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सलमानने आपल्या चित्रपटातून अरिजीतला काढलंदेखील होतं.

या गाण्याच्या टीझरनेच चांगली हवा केली असून प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. सलमानचा हटके डान्स आणि कतरिनाच्या अदा यांच्यासाठी सिनेप्रेमी फार उत्सुक आहेत. ‘टायगर ३’चे हे पहिले गाणे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ यंदाच्या दिवाळीत रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader