विजय देवरकोंडा या दाक्षिणात्य अभिनेत्याने ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं. या चित्रपटात विजयबरोबर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेदेखील झळकली. जोरदार प्रमोशन आणि वेगवेगळ्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करूनही ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही खूप मोठा फटका बसला. आता याच चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांना जीवघेण्या धमक्यादेखील येऊ लागल्या आहेत.

लायगर हा चित्रपट सपशेल आपटल्याने निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच चित्रपटाच्या वितरकांचंही खूप नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. नुकसान भरपाईसाठी काही वितरकांनी पुरी जगन्नाध यांच्या घराबाहेर मोर्चादेखील काढायचा ठरवलं होतं. आता यामुळेच पुरी यांना वितरकांकडून जीवघेण्या धमक्यांचे फोन येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल पुरी यांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे. वितरक अशापद्धतीने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना ब्लॅकमेल करू शकत नाही, जर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा असेल तर सिव्हिल कोर्टात केस फाइल करायला हवी असं पुरी यांचं म्हणणं आहे.

article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
Nagpur jio tower scam loksatta news
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…

आणखी वाचा : “अजूनही तुमच्या रंगाला…” बॉलिवूडमधील ‘या’ गोष्टीबाबत अभिनेत्री कल्की कोचलीनने व्यक्त केली खंत

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार पोलिसांत केलेल्या तक्रारीत पुरी जगन्नाध यांनी वितरकांना त्यांचे पूर्ण पैसे दिले असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी त्यांच्या इतर छोट्या वितरकांना पैसे पुढे न दिल्याने हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचं पुरी यांनी नमूद केलं आहे. पुरी यांच्या कुटुंबालाही वरंगल श्रीनू या वितरकाकडून धोका आहे असंही त्यांनी या तक्रारीत नमूद केलं आहे. हैद्राबादमधील कुटुंबाचा हे वितरक छळ करू शकतात अशी शक्यताही पुरी यांनी वर्तवली आहे.

विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ने पहिल्या दिवशी २५ कोटीची कमाई जरी केली असली तरी नंतर या चित्रपटाची अवस्था फार बिकट होती. करण जोहरने या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती. शिवाय रोनीत रॉय, रम्या कृष्णन हे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसले. पुरी जगन्नाध आणि विजय देवरकोंडा ‘जन गण मन’ या चित्रपटावर काम करत होते, पण आता हा चित्रपट बंद झाला असल्याचं समोर आलं आहे.

Story img Loader