बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं. विविध सोशल मीडिया साईट्सवरून ते त्यांच्या कामाबद्दलचे अपडेट्सच्या त्यांना देत असतात. यातीलच एक म्हणजे सनी लिओनी. परंतु आता ‘लिंक्डइन’ने तिचं अकाउंट थेट ब्लॉक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेसबुक, इंस्टाग्राम याप्रमाणेच सनी लिंक्डइनवरही खूप सक्रिय असते. तिचं प्रोफाइल ती नेहमीच अपडेट ठेवत असते. इतर सोशल मीडिया साइट्सप्रमाणे लिंक्डइनवरतीही सनीचे भरपूर फॉलोवर्स आहेत. पण आता अचानक तिचं अकाउंट ब्लॉक झाल्याने सर्वजण आवाक् झाले. तर अकाउंट ब्लॉक करण्यामागचं लिंक्डइनने दिलेलं कारण ऐकून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : पत्रकाराच्या ‘त्या’ मागणीवर सनी लिओनीच्या उत्तराने वेधलं लक्ष म्हणाली, “आता मी तुमच्याकडे…”

सनीचं लिंक्डइन अकाउंट ब्लॉक झाल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावरून दिली. तिने तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ती म्हणते की, “लिंक्डइनवर काही महिने खूप छान वेळ घालवल्यानंतर आता त्यांनी माझं अकाउंट ब्लॉक केलं आहे. त्यांना वाटलं की मी खरी सनी लिओनी नाही, पण ती मीच होते.” सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “आई झाल्यावर आपल्यावर…”; सनी लिओनीने शेअर केला पालकत्वाचा अनुभव

आता या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे त्यांनी खूप चुकीचं केलं. अकाउंट ब्लॉक करण्यापूर्वी त्यांनी एकदा तपासून पाहायला हवं होतं.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “बरं झालं तुम्ही याबद्दल बोललात. नाहीतर यबद्दल कोणालाही कळलं नसतं.” त्यामुळे आता सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Linkedin blocked sunny leone account actress shared a video about it rnv